श्री दत्ताची आरती श्री दत्ताची आरती त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ता हा जाणा |त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा |नेती नेती शब्द नये अनुमाना |सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ||१||जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता |आरती ओवाळीतां हरिली भवचिंता ||धृ|| सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त |अभ्याग्याशी कैंची कळेल हि मात |पराही परतली तेथें कैचा हेत |जन्ममरणाचा पुरलासे अंत ||२||जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता | दत्त येउनिया उभा ठाकला |सद्भावें साष्टांगे प्रणिपात केला |प्रसन्ना होऊनी आशीर्वाद दिधला |जन्ममरणाचा फेरा चुकविला ||३||जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता दत्त दत्त ऐसें लागले ध्यान |हरपलें मन झालें उन्मन |मीतुं पणाची झाली बोळवण |एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ||४||जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता