श्री दुर्गा देवीची आरती श्री दुर्गा देवीची आरती दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।वारी वारी जन्ममरणाते वारी ।हारी पडलो आता संकट निवारी ।। १ ।।जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।।जय देवी जय देवी ।। धृ० ।। त्रिभुवन भुवनी पहाता तुज ऐसी नाही ।चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।साही विवाद करिता पडले प्रवाही ।ते तू भक्तालागी पावसी लवलाही ।। २ ।। प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा ।नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। ३ ।।